Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Satara › विकासामध्ये राजकारण आणू नका : पृथ्वीराज चव्हाण 

विकासामध्ये राजकारण आणू नका : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:13PMकराड : प्रतिनिधी

कराड-ढेबेवाडी रस्ता बघितला की, हा भाग पुढारलेला दिसतो. या भागात विकासाचे हेच चित्र कायम राखण्याचा माझा प्रयत्न राहील. विकासासाठी मी प्रयत्नशील आहे, पण विकासकामे राबवत असताना राजकारण आणू नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना केले.  

कोळेवाडी (ता. कराड) येथे ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जे. के. पाटील, भीमराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.  

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दळणवळण, रस्ते, पाणी या मूलभूत कामांकडे माझे सर्व लक्ष आहे. डेळेवाडी ते अंबवडे बससेवा विस्तारीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वानरवाडी तलावाच्या विकासासाठी   निधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. सरकारचे नियोजन चुकले आहे. त्यांनी सुरुवातीला लोकप्रिय निर्णय घेतले. परंतु विकासासाठी लागणार्‍या करामध्ये सरकारने शहरी आणि ग्रामीण अशी विभागणी केल्याने कररूपी निधीतून  हजार कोटीचा फटका बसला. त्यातच शासकीय कर्मचारी पगार व कर्जमाफी रखडली. अनेक चुकीच्या निर्णयांमुळे सरकार अडचणीत आले आहे. आघाडी सरकारचा सामान्य माणसाला पुढे नेण्याचा विचार होता.

खाद्यान्न सुरक्षा योजनेतून दारिद्रय निर्मुलनाला मदत झाली. हा मूळ विचार सोडून  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा लोकांना काय फायदा होणार? असा प्रश्‍नही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावेळी राजेंद्र चव्हाण, प्रशांत चव्हाण यांचे भाषण झाले. आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. जालिंदर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कोळेकर यांनी आभार मानले. यावेळी सुभाषराव पाटील, सयाजीराव यादव, धनाजीराव पाटील, अनिल माळी, दत्तात्रय गुरव, संतोष डेरे, भीमराव पाटील, सतीश पाटील, एल. जी. देसाई, नारायण पाटील, गणेश गरुड यांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्र्यांना पश्‍चिम महाराष्ट्राविषयी आकस..

मुख्यमंत्र्यांना पश्‍चिम महाराष्ट्राविषयी आकस आहे. त्यातून विकासाचा निधी थांबवला असल्याने आम्ही विधानसभेत विरोध केला. निधीच मिळत नसल्यामुळे गतवर्ष हे झिरो विकास वर्ष झाले. याउलट यापुर्वीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी उर्वरित महाराष्ट्राबाबत कधीच दुजाभाव केला नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

Tags : karad, karad news, Prithviraj Chavan, development, politics,