Mon, Sep 24, 2018 16:53होमपेज › Satara › झेडपीच्या अभियंत्यांची दुसर्‍या दिवशीही सामूहिक रजा

झेडपीच्या अभियंत्यांची दुसर्‍या दिवशीही सामूहिक रजा

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 8:10PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्हा परिषद अभियंत्यांनी सामुहिक रजा आंदोलन केले. 

या आंदोलनात जिल्ह्यातील 197 अभियंते सहभागी झाले होते. जि. प. तील अभियंत्यांना प्रवासभत्यापोटी दरमहा किमान 10 हजार मासिक वेतन अदा करावे, मुंबई उच्च न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपिठाने संघटनेच्या याचिकेवेर दिलेल्या निर्देशानुसार नविन उपविभाग तात्काळ निर्माण करावेत, जि. प.  कडील अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्याबाबत करावयाची वेतन निश्‍चिती, जलसंपदा विभागाच्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश निर्गमीत करावेत, जि. प. कडील कनिष्ठ अभियंता संवर्गातील  व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तात्काळ भरावीत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना  द्यावयाच्या  पदोन्नती कोटा मंजुर पदाच्या  प्रमाणात पुनर्विलोकीत करावा, जि. प. कडील अभियंता  संवर्गासाठी जिवनदायी आरोग्य विमा  योजना लागू करावी, जि. प. कडील कनिष्ठ अभियंत्यांना व्यवसायिक परिक्षेबद्दल लागू केलेले दि. 21 एप्रिल 2016 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष आर.वाय. शिंदे व जिल्हाध्यक्ष अजय शितोळे यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कामांचा खोळंबा झाला.

Tags :District Council, Engineers Association, collective leave protest, Satara News