Wed, Jan 16, 2019 13:28होमपेज › Satara › पोलिस पाटील संघटनेची समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पोलिस पाटील संघटनेची समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उंडाळे : प्रतिनीधी  

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे  अध्यक्ष मोहनराव शिंगटे यांचे मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने कराड येथे शनिवारी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या आणि महिला पोलीस पाटील यांना काम करताना होणार्‍या गैरसोईबाबत यावेळी सविस्तर चर्चाही करण्यात आली.

यावेळी पोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी  महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील, दुग्धविकास व पशुसवर्धनमंत्री  महादेवराव जानकार, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  प्रविण राक्षे पाटील, विजय थोरात पाटील,  दिपक जगताप - पाटील,  दिपक पाटील, राहुल लोंढे - पाटील व प्रशांत गावडे - पाटील व महिला पोलीस पाटील कदम यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने प्रलंबित मागण्या व समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.