Wed, Jan 16, 2019 14:14होमपेज › Satara › मसूर येथून सोमवारी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान

मसूर येथून सोमवारी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 7:51PMमसूर : वार्ताहर

मसूर ता.कराड येथून आषाढी एकादशी निमित्‍त प्रतिवर्षाप्रमाणे मसूर ते श्री क्षेत्र बोरबन पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार दि.23 रोजी सकाळी 7 वाजता पालखी प्रस्थान होणार असून सदर दिंडी सोहळयाचा मसूर व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र बोरबन येथे श्री विठ्ठलाची पुरातन स्वयंभू मुर्ती आहे.आषाढी एकादशीला येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते भाविकांचा प्रतिवर्षी येथे मोठा ओढा वाढत असल्याने प्रतिपंढरपूर म्हणून बोरबनची ओळख झाली आहे.सर्वांनाचा वारीतून पंढरपूरची श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसते यासाठी मसूर येथील दिंडी समितीने या भक्‍तांसाठी मसूर ते बोरबन पायी दिंडी सोहळा सुरू ठेवला आहे.   दिंडीत हजारो महिला, भावीक, युवकवर्ग सहभाग घेत असतात. सोहळयातील परतीच्या प्रवासासाठी गाडयांची मोफत व्यवस्था केली जाते.

दिंडी चालक सतिश पाटील, उदय वेल्हाळ, चंद्रशेखर वेल्हाळ, दिलीप धोंडूगडे, भूपाल लोखंडे, मुरलीधर उमरदंड, बर्गे तात्या, भास्कर बुवा, वाकडे बुवा, श्रीरंग थोरात,आक्‍काताई लोहार, कमलेश मोहोळकर, पांडूरंग काशीद आदींच्या सहाय्याने व पालखी सहाय्यक ,आयोजक कमिटी तसेच सर्व मसूर भागातील भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी सोहळयास मसूर व मसूर परिसरातील भाविकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.