Tue, Nov 20, 2018 03:33होमपेज › Satara › डिझेल टँकर पलटी झाल्याने महामार्ग जाम

डिझेल टँकर पलटी झाल्याने महामार्ग जाम

Published On: Apr 24 2018 10:30AM | Last Updated: Apr 24 2018 10:37AMभुईंज : वार्ताहर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथे मंगळवारी सकाळी डिझेल टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

या बाबत घटनास्थळी मिळालेली माहीती अशी, सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने जाणारा डिझेल टँकर पाचवड येथे उड्डाणपूल बंद असल्याने सर्विस रोडवर वळवताना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्यामुळे महामार्गावर डिझेल वाहू लागले होते. दरम्यान भुईंज पोलीस स्टेशनचे पीएसआय दुर्गानाथ साळी यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

टँकर पलटी झाल्याने वाहतूक येथील जोशी विहिरीपर्यंत ठप्प झाली होती. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी किसनवीर कारखान्याने अग्निशमन दल पाठवले होते.  

Tags : Diesel Tanker, accident, NH4 high way, pachwad satara, traffic jam,