Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Satara › ढेबेवाडी : कुटुंबीयांसह धरणात उडी घेत जीव देऊ

ढेबेवाडी : कुटुंबीयांसह धरणात उडी घेत जीव देऊ

Published On: Jan 13 2018 6:35PM | Last Updated: Jan 13 2018 6:25PM

बुकमार्क करा
ढेबेवाडी : प्रतिनिधी

वांग - मराठवाडी धरणात सर्व जमीन गेल्यानंतर ताईगडेवाडीत 9 वर्षापूर्वी केवळ कागदोपत्री पुनर्वसन करण्यात आले आहे. धरणग्रस्‍तांना आजवर जमिनीचा ताबाच दिला नाही, असा दावा करत घोटील (ता. पाटण) येथील धरणग्रस्तांनी कुटुंबियांसह धरणात उडी घेत प्राण देऊ, पण कोणत्याही स्थितीत वांग - मराठवाडीचे काम पूर्ण करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

ताईगडेवाडी गावठाणात धरणग्रस्तांना भूखंड देण्यात आले. तसेच ज्या नागरी सुविधा अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करून देतो असे आश्वासनही देण्यात आले होते. पण 9 वर्षानंतरही परिपूर्ण नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. धरणात पाणी अडविल्याने आम्ही स्थलांतर केले. त्यावेळी आमच्या पसंतीनुसार परिसरातील 13 गावामधल्या जमिनीचे वाटपही केले. पण अधिकाऱ्यांनी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही. आज नऊ वर्षे झाली, तरी आम्हाला त्या जमिनीत मूळ शेतकऱ्यांनी साधा पाय टाकू दिलेला नाही. त्यामुळे याबाबत सर्व महसूल अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, कृष्णा खोरे या सर्व विभागांकडे तक्रारी केल्या. पण कुणी दाद घेत नाही, असा दावा धरणग्रस्तांनी केला आहे.