Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Satara › जांब येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ 

जांब येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ 

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:23PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

खटावमधील जांब येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गावातील आणखी सहा लोकांना ताप थंडी तसेच डेंग्यू सदृश्य  लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संशयीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने रविवारी पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख यांनी सांगितले.

जांब ( ता. खटाव ) येथील दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला गेल्या पाच दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू लागल्याने कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले. पुढील तपासण्या केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जांब  येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याचे समताच परिसरात खळबळ उडाली. गावातील आणखी सहा रुग्णांवर  औंध आणि आसपासच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. खटाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य कर्मचार्‍यांनी जांब येथे भेट देवून पहाणी केली. सर्वच संशयीत रुग्णांच्या

रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. शेख यांनी सांगितले. बाहेरुन डेंग्यू झालेला रुग्ण गावात आल्याने डासांमार्फत हा रोग पसरल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान आरोग्य विभागाने गावात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जांबमधील ग्रामस्थांनी केली आहे.