Thu, Apr 25, 2019 12:12



होमपेज › Satara › पाडळोशी गावात तीव्र पाणी टंचाई 

पाडळोशी गावात तीव्र पाणी टंचाई 

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 9:01PM



चाफळ : राजकुमार साळुंखे 

चाफळ विभागातील पाडळोशी (ता. पाटण)  गावात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावात ग्रँव्हिटी नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो मात्र, गेल्या एक महिन्यापासून डोंगरात असलेल्या झर्‍याचे पाणी कमी झाल्याने रात्रभर टाकीत कमी प्रमाणात पाणी साठत  असल्याने यांचीच झळ पाडळोशी गावाला बसत आहे. यामुळे गावातील महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करुन पाणी मिळवावे लागत आहे. 

चाफळ पासून अकरा कि.मी.अंतरावर पाडळोशी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास असून गावाला अनेक वर्षापासून ग्रँव्हिटी नळयोजनेद्वारे चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होत होता. मात्र सध्या डोंगरातून ज्या झर्‍यातून पाण्याच्या टाकीत पर्यंत पाणी आणले आहे तेच पाणी तीव्र उन्हाच्या तडाक्यामुळे दिवसेंदिवस कमी होवू लागले आहे त्याचाच परिणाम गावाच्या पाणी पुरवठ्यावर होवू लागला आहे.झर्‍याच्या भोवती असलेली दाट झाडी देखील काही ग्रामस्थांनी तोडल्याने झर्‍याचा परिसर भकास झाला आहे याचाही परिणाम पाणी साठप्यावर झाल्याचे जाणवत आहे. पाडळोशी गावात सात बोअर असून त्यापैकी एकच बोअर चालू असून तीन बंद अवस्थेत आहेत तर तीन गायब झाल्या आहेत. 

एक आड आहे मात्र त्यात भरपूर प्रमाणात गाळ व आजूबाजूला झाडी वाढली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने आडातील गाळ व वाढलेली झाडी तोडून परिसर स्वच्छ करावा तसेच बंद असलेल्या बोअर दुरुस्ती साठी संबधितांना प्रस्ताव पाठवावेत व गायब झालेल्या बोअरचा शोध घ्यावा अशी मागणी पाडळोशीतील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. गतवर्षी आ.शंभूराजे देसाई यांनी पाडळोशीसह ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या मसुगडेवाडी, तावरेवाडी, नारळवाडी या गावाचा पाण्याचा प्रश्‍न मिटावा म्हणून प्रत्येक गावास दहा लाख रुपयाचा निधी मिळावा यासाठी प्रस्ताव संबधित विभागाकडे अंतिम मजूरीसाठी पाठवला आहे. तर टंचाई मधून शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार यांनी देखील निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. असे असले तरी सध्या मात्र पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

पाणी टंचाई यंदा निर्माण झाली

पाच माझ्या पाच वर्षाच्या काळात कधीच गावाला पाणी टंचाई भासू दिली नाही. तीव्र उन्हाळा लागण्यापुर्वीच झर्‍याच्या परिसराची मजूर लावून स्वच्छता करत होतो.व पाणी रात्रभर जादा टाकीत कसे रहिल यांचे योग्य नियोजन करीत होतो.त्यामुळेच गावाला भरपूर पाणी मिळत होते,  अस ेमाजी सरपंच जनाबाई सुतार यांनी सांगितले. तर पाडळोशी गावचे सरपंच शिवाजी पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले गावाला पाणी जेथून येत आहे तेथेच पाणी कमी झाले आहे त्यामुळे ग्रामस्थानी जे पाणी मिळतय ते वादावादी न करता घ्यावे.

Tags : Satara, Deep, water, shortage, Padloshi village