Tue, Nov 20, 2018 23:52होमपेज › Satara › लग्‍नाच्या वाढदिवसालाच पत्नीचा अपघातात मृत्यू

लग्‍नाच्या वाढदिवसालाच पत्नीचा अपघातात मृत्यू

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी 

लग्‍नाच्या वाढदिवसानिमित्त आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलला जेवायला जात असताना दुचाकीला पाठीमागून चार चाकी वाहनाने धडक दिल्याने कोमल अनिल मोरे यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची मुलगी जखमी झाली आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल मोरे व त्यांची पत्नी कोमल मोरे हे दोघे लग्‍नाचा वाढदिवस असल्याने वाढे फाटा येथून त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला निघाले होते. शुक्रवारी रात्री ते दुचाकीवरून वाढे फाटा येथे आले असता त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये पाठीमागे बसणार्‍या कोमल मोरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या अपघतात त्यांची मुलगीही जखमी झाली. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिस दाखल झाल्यामुळे संबधित चार चाकी चालक पसार झाला. कोमल यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Satara, Death, wife,  marriage, anniversary