Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Satara › थांबलेल्या ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

थांबलेल्या ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

Published On: Dec 02 2017 3:31PM | Last Updated: Dec 02 2017 3:30PM

बुकमार्क करा

उंब्रज : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इंदोली फाटा (ता.कराड ) येथे ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आला. सदरची घटना शनिवारी दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी ६च्या सुमारास उघडकीस आली आहे. बाळासाहेब रामचंद्र पवार (वय 62, रा. पलूस, जि.सांगली) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे.

दरम्यान ट्रक चालकाचा मृत्यु  हृदयविकाराने झाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याबाबत उंब्रज पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, महामार्गावर इंदोली फाटा येथील सोहम पेट्रोल पंपावर ट्रक (क्रं. एमएच १० ए २३८९) हा बराच वेळ उभा असल्याचे पंपावरील कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रक जवळ जावून केबिन मध्ये पाहिले असता, ट्रक चालक स्टेरींगवर  झोपलेला दिसला. ट्रकचालक पवार यांना उठवण्याचा प्रयत्न कामगारांनी केला मात्र, ते उठले नाहीत. कामगारांनी तातडीने उंब्रज पोलिसांना फोन केला. उंब्रज पोलीसानी घटनास्थळी येवून पाहणी केली असता, ट्रक चालक पवार हे मृत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. 

मृतदेहाचे शवविच्छेदन कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. चालकाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.