Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Satara › पुण्यतिथीचा खर्च पाणी फाऊंडेशनला

पुण्यतिथीचा खर्च पाणी फाऊंडेशनला

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:16PMसातारा : प्रतिनिधी

माण तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सर्वच घटक श्रमदानाची कामे हाती घेऊ लागली आहेत. अशावेळी पतीच्या पुण्यतिथीसाठी येणारा खर्च पाणी फौंडेशनकडे सुपूर्द करून नलिनी पवार यांनी आदर्श घालून दिला आहे. या माध्यमातून पवार यांनी आज आपल्या पतीला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे, असे उद‍्गार भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई यांनी काढले. 

कळस्करवाडी, ता. माण येथील नलिनी पवार यांच्या पतीची सोमवारी पुण्यतिथी होती. या पुण्यतिथीवर खर्च न करता तो निधी अनिल देसाई यांच्याहस्ते पाणी फौंडेशनकडे दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द केला. याठिकाणी सुरू असलेल्या श्रमदानाच्या कामात अनिल देसाई सहभागी झाले होते. यावेळी बबन पवार, ओंकार पवार, पांडुरंग पवार, तानाजी कदम, विठठ्ल पवार, विनोद सावंत, ज्योतीराम पवार व मान्यवर उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, पतीच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडण्यास खूप अवधी लागतो. अशा परिस्थितीत पती निधनानंतर दु:खातून बाहेर पडून येणार्‍या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे काम नलिनी पवार यांनी केले आहे. पवार यांनी फौंडेशनला फक्‍त निधीच दिला नाही तर कळस्करवाडीमध्ये श्रमदान करणार्‍या नागरिकांसाठी अल्पोपहार देवून त्यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे. तालुक्यात पवार यांच्यासारख्या आणखी सावित्रीच्या लेकींनी मदतीसाठी  पुढाकार घेतल्यास येत्या काही वर्षात माण तालुका दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल.

दरम्यान, या कामासाठी सलग 10 दिवस जेसीबीचा खर्च देण्याची घोषणा देसाई यांनी यावेळी केली. ना. चंद्रकांत  पाटील आणि आ. योगेश सागर आणि भाजपचे अन्य नेतृत्व यांच्या वतीने माण-खटावचा दुष्काळी प्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. आवश्यक तेथे होत असलेले जेसीबी वाटप हाही या प्रयत्नाचाच भाग आहे. भाजपच्यावतीने होत असलेला पाठपुरावा आहे असेही देसाई यांनी केले.

 

Tags : satara, satara news, Death Anniversary, cost, water Foundation,