होमपेज › Satara › महाबळेश्‍वरमध्ये दरीत पुरुषाचा बेवारस मृतदेह

महाबळेश्‍वरमध्ये दरीत पुरुषाचा बेवारस मृतदेह

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 11:53PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वरच्या ऑर्थरसीट पॅाईंट येथील गॅलरीपासून 2500 ते 3000 फूट खोल दरीत अंदाजे  25 ते 30 वयोगटाच्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. 

शनिवारी सायंकाळी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन ऑर्थर सीटवरून दुर्बिणीने पाहणी केली. परंतु, उशीर झाल्याने रात्री न उतरता सकाळी आठच्या सुमारास महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, सनी बावळेकर  यांच्यासह सुमारे 20 स्वयंसेवक या दरीत उतरले. दरीच्याजवळ चौथ्या टप्प्यांत मृतदेह असल्याने ते वर आणण्यास तीन ते चार तासांहून अधिक वेळ लागला.

संदीप अशोक जांभळे (वय  25 रा. लिंगमळा) यांनी याबाबत खबर दिल्याची पोलिस ठाण्यात नोंद आहे. या बेवारस मृतदेहाचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून एक महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मदतीचे आवाहन केले आहे. या मृतदेहाच्या अंगावर निळ्या रंगाची कॉपर क्लोदिंग या कंपनीची जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाची अंडरवेअर, पांढर्‍या रंगाचे हाफ बनियन आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.