Mon, Aug 19, 2019 06:01होमपेज › Satara › कराड : धोकादायक गतीरोधक हटवले (व्हिडिओ)

कराड : धोकादायक गतीरोधक हटवले (व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 2:09PM | Last Updated: Dec 08 2017 1:52PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

गुरूवारी मनसेने विरोध केल्यानंतरही कॉटेज हॉस्पिटल तसेच कराड अर्बंन बँक परिसरात कराड - विटा मार्गावरील गतीरोधक नगरपालिकेने हटवले नव्हते. त्यामुळे गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता धोकादायक गतिरोधकमुळे एका पोलिस कर्मचाऱ्यांसह दोन  महिला मोटरसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. याशिवाय आणखी तीन ते चार जणांना किरकोळ मार लागला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने गतीरोधक हटवण्याची सूचना ठेकेदारास केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांसह कराडमधील नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष दुपारी कॉटेज परिसरातील दोन तर अर्बंन बँक, पोलिस स्टेशन परिसरातील दोन गतीरोधक हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

यावेळी नागरिकांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड. विकास पवार,  उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, सागर बर्गे, आशिष रैनाक, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण हेही उपस्थित होते. गतीरोधक हटविल्याशिवाय बाजूला जायचे नाही, अशी भूमिका त्या सर्वांनी घेतली होती.