होमपेज › Satara › ‘कस्तुरीं’ना सेलीब्रेटींसमवेत संक्रांतीचं वाण 

‘कस्तुरीं’ना सेलीब्रेटींसमवेत संक्रांतीचं वाण 

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सभासद महिला व युवतींसाठी मकर संक्रातीनिमित्त  शनिवार दि. 20 रोजी सायं. 4 ते 7 यावेळेत ओम एक्झिक्युटिव्ह  येथे  हळदी -कुंकू आणि तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान झी मराठी वाहिनीवरील ‘लागीरं’च्या टीमशी  महिलांसाठी गपशप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ते खास आकर्षण असणार आहे. 

मनाचा गंध चौफेर दरवळत ठेवणार्‍या दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे निखळ मनोरंजन, प्रशिक्षण आणि ज्ञानात भर टाकणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये परफेक्ट ब्लॅक मॅचिंग स्पर्धा, ‘मॉम अ‍ॅण्ड बेबी फॅशन शो’ घेण्यात येणार असून यामधील विजेत्यांना पद्मनाभ अलंकारकडून एक ग्रॅम सोन्याची ठुशी व टपर वेअर टीमलीडर प्रज्ञा माने यांच्याकडून तीन लकी ड्रॉ कूपन व दोन आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार  आहेत. तसेच   सुवर्ण  स्पर्शतर्फे येणार्‍या सर्व महिलांना  वाण  स्वरुपात गोल्ड प्‍लेटेड दोन बांगड्यांचे कूपन, कणक ब्युटीपार्लर, खण आळी यांच्यामार्फत  ब्लीच कूपन देण्यात येणार असून  लकी ड्रॉ व्दारे हेअर स्पा,  सुवर्ण स्पर्शकडून सोन्याची  नथ, ऐश्‍वर्या फार्म हाऊस, डबेवाडी यांच्याकडून तीन जेवण  कूपन्स, चोवीस कॅरेट बिर्याणी हाऊस, विसावा नाका यांच्याकडून  पाच जेवण कूपन इत्यादी कूपनही देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सह प्रायोजन हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह  अमित जगताप हे आहेत.  हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह संपूर्ण कौटुंबिक व व्यावसायिक दर्जाचे हॉटेल  असून  येथे लग्न, वाढदिवस, रिसेप्शन, बारसे, ओटीभरण, गेट टुगेदर, भिशी पार्टी व इतर कार्यक्रमासाठी विशेष पॅकेज सिस्टीम उपलब्ध आहे. 7000 स्क्वेअरफूटचा ओपन लॉन 5 हजार स्क्वेअर फूटचा मल्टीपर्पज हॉल वाजवी दरामध्ये उपलब्ध असून प्रशस्त स्टेजबरोबर बॅगराऊंड, दहा राऊंड टेबल तत्पर  सेवा व विनम्र स्टाफ असून   जेवणामध्ये  व्हेज-नॉनव्हेज, इटालियन फूड, चायनीज  पदार्थ  उपलब्ध आहेत. 

हळदी-कुकू कार्यक्रमादरम्यान ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्यच्या मामीचा बचतगटातील (राहुल्याची आई आणि सुमी या व्यक्तीरेखा साकारणार्‍या) महिला सदस्या उपस्थित महिलांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची  व  सभासद नावनोंदणी केली जाणार असून  अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी तेजस्विनी बोराटे (8805007192) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.