Sun, May 19, 2019 22:34



होमपेज › Satara › ‘पुढारी एज्यु दिशा’ची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

‘पुढारी एज्यु दिशा’ची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Published On: Jun 03 2018 1:20AM | Last Updated: Jun 02 2018 10:59PM



सातारा : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देणार्‍या ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ या शैक्षणिक प्रदर्शनाला पाच दिवस उरले असून या प्रदर्शनाबाबत येथील शैक्षणिक वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यार्थ्यांमध्येही त्याचीच चर्चा असून हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा व नवी उमेद देणारेच ठरणार आहे. 

नव्या शैक्षणिक वर्षाचा बिगुल वाजला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाला असून लवकरच दहावीचाही निकाल लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाचीही धांदल सुरू झाली आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांना खरी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील बदलांमुळे अनेक अभ्यासक्रम अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. करिअरच्या एका टप्प्यावर बहुपर्याय समोर दिसत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळून जात असतात. त्यासाठी या मार्गदर्शनाची म्हणजे वाटाड्याची भूमिका ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून बजावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दि. 8 ते 10 जून या कालावधीत अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र्रात हे प्रदर्शन संपन्न होत आहे. करिअरच्या शोधात असणार्‍या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन नक्कीच पर्वणी ठरणार आहे. 

प्रदर्शन काळात दररोज विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये एमपीएससी, युपीएससी तयारी, आयटी मार्गदर्शन, स्पर्धा परिक्षा व संधी, मेडिकल व इंजिनिअरिंगमधील संधी तसेच करिअरच्या विविध संधी याविषयांवर तज्ञ मंडळींकडून अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या करिअरविषयी असणार्‍या असंख्य अडचणी दूर होणार आहेत.

शैक्षणिक वर्ष सुरु होताना पालकांसह विद्यार्थ्यांना प्रवेश कोठे घ्यायचा इथपासून कोर्ससाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, फी, प्रवेश जागांसह इतर सोयी, सुविधांची माहिती, विविध विषयांतील करिअरच्या संधी, शिक्षण देणार्‍या संस्था आदींची माहिती ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सातार्‍याच्या शैक्षणिक वर्तुळात      या प्रदर्शनाचीच चर्चा सुरु आहे. 

पर्याय निवडण्याची विद्यार्थी व पालकांना संधी...
‘पुढारी एज्यु दिशा’ या शैक्षणिक  प्रदर्शनात नामवंत शिक्षण संस्थांचाही सहभाग असणार आहे. करिअरच्या अगणित संधी प्रदर्शनातून सहज उपलब्ध होणार आहेत. शिक्षणाची परिपूर्ण माहिती देणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्यादृष्टिने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामध्ये  कायदा क्षेत्रातील संधी, प्रवेश व शुल्क नियोजन कायदा, एरोनॉनिक इंजिनिअरिंग, एम.बी.ए.मधील करिअर संधी, कला क्षेत्रातील संधी, वैद्यकीय क्षेत्रातील संधी, हॉटेल व्यवसायातील संधी, अ‍ॅटोमेशनमधील करिअर संधी, एमपीएससी व युपीएससीमधील संधी, फार्मसी व  बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमधील संधी अशा विविध विषयांवर नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यातून विद्यार्थी व पालकांना पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.