Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Satara › महेश नागरी पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार 

महेश नागरी पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार 

Published On: May 24 2018 2:59PM | Last Updated: May 24 2018 2:59PMसातारा : प्रतिनिधी

भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) यांच्यासह सहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, संशयीत आरोपींचे अटकसत्र सुरू झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जाधव हे २००३ ते २०१३ दरम्यान महेश नागरी पतसंस्थेचा दैनंदिन कारभार पाहत होते. संस्थेचे सर्व रेकॉर्ड त्यांच्या नियंत्रणात होते. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत खोटी कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारे विविध कर्ज व सेव्हिंग खात्यामध्ये खोटे हिशेब जमा-खर्च लिहिले. तसेच रेकॉर्डमध्ये व्हाईटनरच्या साह्याने खाडाखोड करूल नोंदी बदलून सुधीर जयसिंग जाधव, विजया अनिल जाधव, जयसिंग मानसिंग जाधव (सर्व रा. करंडी), अजित श्रीमंत देशमुख व शिवाजीराव बाजीराव देशमुख (दोघे रा. मांडवे, ता. सातारा) यांच्या संगनमताने संचालक मंडळाची परवानगी नसताना १ कोटी २१ लाख ८ हजार रुपयांचा अपहार केला.

याप्रकरणी सनदी लेखा परीक्षक हेमंत अनंत कुलकर्णी (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Tags :  satara Mahesh Nagari Credit Society, scam