Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Satara › मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सोअंतर्गत युवकावर गुन्हा

मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सोअंतर्गत युवकावर गुन्हा

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:44PMवडूज : वार्ताहर

खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद होऊन एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, तालुक्यातील एका गावामध्ये शनिवारी (दि. 30) सकाळची शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी आली. त्यानंतर तिची आई घराशेजारी असणार्‍या शेतामध्ये मजुरीसाठी गेली होती. ती शाळकरी मुलगी आईकडे गेली असता, आईने तिला घरातून टफ घेऊन येण्यास सांगितले. मुलगी घरी जाऊन पुन्हा आईकडे आली असता, आईने विचारले टफ का आणला नाही? त्यावेळी तिने नरेंद्र इंगवले याने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली. 

यानंतर पीडित मुलीच्या आईने नरेंद्र अरविंद इंगवले याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून नरेंद्र इंगवले याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होवून त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा तपास पो. नि. यशवंत शिर्के  करीत आहेत.