Mon, Sep 24, 2018 11:57



होमपेज › Satara › मुख्याध्यापकला मारहाण करून खंडणीची मागणी; भाजप, शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक

मुख्याध्यापकाला मारहाण; भाजप, शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक

Published On: May 31 2018 2:37PM | Last Updated: May 31 2018 2:31PM



सातारा : प्रतिनिधी

सातारा शासकीय विश्रामगृह येथे अमोल एकनाथ कोळेकर (रा. कोंडवे) या मुख्याध्यापकांना कोंडून मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपच्या सुनील काळेकर, संदीप मेळाट आणि शिवसेनेच्या हरिदास जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित चौघांनी १६ मे रोजी सर्किट हाऊस येथील ९ नंबरच्या खोलीमध्ये तक्रारदार अमोल कोळेकर यांना कोंडले. चप्पलने मारहाण करत एक प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास रिव्हॉल्वर, तलवार असल्याचे सांगून खून करण्याची धमकीही दिली. ही सर्व घटना दुपारी १ ते ४ या कालावधीत सर्किट हाऊस येथे घडली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित जामीनासाठी जिल्हा न्यायालयात गेले मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. अखेर संशयितांना गुरुवारी दुपारी उशिरा शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकला थेट मारहाण करत खंडणीची मागणी झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या अधिक तपास करत आहेत.