Tue, Jul 23, 2019 07:07होमपेज › Satara › खोडद फाट्यावर चोरटी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा 

खोडद फाट्यावर चोरटी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा 

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:45PM

बुकमार्क करा

वेणेगाव : वार्ताहर 

खोडद फाटा (ता. सातारा) गावच्या हद्दीत हायवेलगत हॉटेल नवमीच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला देशी-विदेशी दारूची विनापरवाना चोरटी विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दयानंद जनार्दन शेट्टी  (वय 32, रा. खोडद फाटा) याच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आठ वाजता सपोनि  संतोष चौधरी यांना हॉटेल नवमीच्या पाठीमागे विनापरवाना देशी-विदेशी दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बाळासो पवार,  पोलिस नाईक मनोहर सुर्वे, पोलिस शिपाई टिकोळे यांनी खोडद फाटा येथे सापळा रचून संशयित दयानंद शेट्टी यास ताब्यात घेतले.

या कारवाईत एकूण 180 मिलीच्या 42  बाटल्या असा सुमारे 5 हजार 52 रुपयांचा माल बोरगाव पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मुंबई प्रोव्ही अ‍ॅक्ट कलम 65 ई प्रमाणे करण्यात आली असून या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार बाळासो पवार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.