Thu, Apr 25, 2019 15:38होमपेज › Satara › नगरसेवकाच्या मुलाला बलात्कारप्रकरणी अटक

नगरसेवकाच्या मुलाला बलात्कारप्रकरणी अटक

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

एका मोबाईल स्टोअरमध्ये कामाला असणार्‍या युवतीला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (मेढा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे संशयित हा मेढ्यातील नगरसेवकाचा मुलगा असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित युवती सातार्‍यातील असून सप्टेंबर 2017 मध्ये एका मोबाईल स्टोअरमध्ये काम करण्यासाठी तिने बायोडाटा दिला होता व तिला काम मिळाले होते. त्यावेळी संशयित संतोष पवार हा मोबाईल स्टोअरमध्ये असल्याने त्याने युवतीशी मैत्री करण्याचा बहाणा केला. यावेळी गिफ्ट देवून युवतीला बाहेर फिरायला येण्याची ऑफर दिली. मात्र, युवतीने त्याला नकार दिला. यातूनच चिडून जावून त्याने ऑफिसमध्ये युवतीशी अश्‍लील चाळे केले व त्याबाबतची घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर काही दिवसांनी संशयित संतोष पवार याने मोबाईल ट्रेनिंगचे काम पुणे येथे असल्याचे सांगून युवतीला डेक्‍कन येथील द मोनेटा लॉग या हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलमध्ये एकटीचा गैरफायदा घेवून संशयिताने युवतीवर अतिप्रसंग करुन बलात्कार केला. यावेळी संशयिताने मोबाईलवर फोटो काढले व घडलेल्या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सातार्‍यात आल्यानंतर संशयिताने पुन्हा फोटो दाखवत धमकी देवून सातार्‍यातील कार्यालयात व उरमोडी येथे वारंवार बलात्कार केला.

युवती प्रत्येकवेळी या घटनेला प्रतिकार करत होती. मात्र, संशयित पप्पाच्या गनने जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर युवतीने सारा प्रकार घरामध्ये सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी संशयित संतोष पवार याला अटक केली. बंदुकीची धमकी दिल्याने याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टचाही गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, संतोष पवार याचे वडील मेढा नगरपंचायतीमध्ये विद्यमान नगरसेवक आहेत.