Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Satara › कोरेगावात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुलाची उभारणी

कोरेगावात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुलाची उभारणी

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:38PMकोरेगाव : प्रतिनिधी

जगात बांधकाम तंत्रज्ञानामध्ये विश्‍वसनीय नाव म्हणून गणले जात असलेल्या लिथली आर्च पध्दतीचा वापर आशिया खंडामध्ये पहिल्यांदाच करण्याचा मान सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला आहे. कोरेगाव येथे तिर्थक्षेत्र असलेल्या केदारेश्‍वर मंदिरासमोर कोट्यवधी रुपये खर्चुन हा पूल उभारला जात असून,  जिल्ह्यातील वरिष्ठ अभियंत्यांची  या पुलाची पाहणी केली. 

आ. शशिकांत शिंदे यांनी केदारेश्‍वर मंदिरासमोर एक मोठा आणि एक छोटा पूल उभारणीसाठी मंजुरी दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली नागपूर येथील आर्च इन्फ्रा या ठेकेदार कंपनीचे चेतन पवार व राजू शहाडे हे पुलाचे काम करत आहेत. सातारा येथील अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी वेगळ्या पध्दतीचा पूल बांधण्याचा संकल्प केला होता.  युरोपसह जगात विश्‍वसनीय म्हणून ओळखल्या जात असलेल्या लिथली आर्च पध्दतीच्या तंत्रज्ञानाचे बारकावे तपासले आणि कोरेगावात ही पध्दती अंमलात आणण्याचे ठरविले.

संभाजी माने व उपअभियंता राहूल अहिरे यांनी लिथली आर्च पध्दतीचे काम  सुरु केले. पुणे येथील मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पुणे प्रदेशातील सहाय्यक मुख्य अभियंता जे. डी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता संभाजी माने, (सातारा), सदाशिव साळुंके (कोल्हापूर), राजेश पाटील (सोलापूर), कार्यकारी अभियंता लक्ष्मण वाघमोडे, संजय सोनावणे, उपअभियंता राहूल अहिरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र नवाळे आदींनी कोरेगावात येवून पाहणी केली.