Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Satara › पूर्ण सत्ता नसल्याने योजना राबवण्यात अडचणी : आ. मकरंद पाटील

पूर्ण सत्ता नसल्याने योजना राबवण्यात अडचणी : आ. मकरंद पाटील

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:40PMवाई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यामातून शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. परंतु गेल्या 15 वर्षात वाईकरांनी आम्हास पूर्ण सत्ता दिली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केली.    

दत्तनगर येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष अनिल सावंत होते. यावेळी प्रताप पवार, शशिकांत पिसाळ, रमेश गायकवाड, संजय लोळे, डॉ.अमर जमदाडे, नगरसेविका रेश्मा जायगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

सिध्दनाथवाडी (दत्तनगर) येथील सि.स.नं. मधील अ‍ॅप्रोच रस्ता खडीकरण, डांबरीकरण व अंतर्गत रस्ते सिमेंट क्राँक्रिट करण्यासाठी नगरोत्थान योजनेमधून निधी मंजूर झाला आहे.   स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. कृष्णा नदीच्या दक्षिणेस घाटाच्या नवीन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.         

यावेळी अनिल सावंत, प्रताप पवार, राजेश गुरव यांची भाषणे झाली. नगरसेविका प्रियांका डोंगरे यांनी प्रास्तविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचलन केले. देवकुमार यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, दत्तनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.