होमपेज › Satara › सातार्‍यात काँग्रेसची संविधान रॅली

सातार्‍यात काँग्रेसची संविधान रॅली

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 9:01PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रजासत्ताकदिनी संविधान बचाव, देश बचाव ही रॅली काँग्रेस कमिटी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अशी काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी असलेल्या बैलगाड्या लक्षवेधक ठरल्या. यावेळी विविध घोषणाबाजीने मोर्चा मार्ग दणाणून गेला होता.

संविधान बचाव रॅलीस  व  मोर्चास जिल्हा काँग्रेस भवन येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील  यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ झाला. अ‍ॅड. विजयराव कणसे, अविनाश बाचल, सौ. रजनीताई पवार, सौ. धनश्री महाडिक, रवींद्र झुटींग, बाळासाहेब शिरसाट व विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शासनाचा निषेध म्हणून बैलगाडी व मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. यावेळी आ. आनंदराव पाटील, सौ. रजनी पवार यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी भाजप सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले.