Sat, Jul 20, 2019 08:43होमपेज › Satara › चाफळ भागात नेत्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था 

चाफळ भागात नेत्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था 

Published On: Feb 27 2018 8:31AM | Last Updated: Feb 26 2018 8:34PMचाफळ : राजकुमार साळुंखे

चाफळ गावचे राजकारण शिवसेनेचे विद्यमान आ. शंभूराज देसाई गट व राष्ट्रवादीचे माजी मंत्री पाटणकर गटा मध्ये प्रामुख्याने विभागलेले. तसेच पाटणकर गटा पासून सध्या दुरावलेले ज्येष्ठ नेते व  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांना देखील मानणारा मोठा वर्ग येथे आहे. गटाच्या राजकारणात येथील प्रत्येक मत येथे निर्णायकपणे विभागलेले दिसून येते. मात्र हल्‍ली काही घटनांमुळे नेत्यांबाबत सर्वसामान्यांची संभ्रमावस्था झाली आहे. 

नुकतीच येथील उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीमध्ये  शिवसेनेच्या गटाचे स्पष्ट बहुमत असताना देखील उमेदवार उमेश पवार चिठ्ठीवर निवडून आले.व त्यामुळे एकाअर्थी  देसाई गटाची थोडी पिछेहाट झालेचे दिसून आले. मागील वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या वेळी देसाई गट विभागला होता. त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला आपले उमेदवार निवडून आणण्यास झाला. नुकतीच गावच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. निवडणूकीमध्ये स्पष्ट बहुमत असताना देखील देसाई गटाच्या माजी उपसरपंच यांनी जिल्हापरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पार्टीचे काम प्रामाणिकपणे केले  व त्यामुळे कदाचित मानसिक त्रास सहन न झालेने राजीनामा दिल्यानंतर देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवून सम समान मते मिळवली. व आपल्यावर अन्याय होत असलेचे अप्रत्यक्ष आपल्या नेत्याला सूचित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विजयाच्या पोष्टरवर देसाई गटाच्या सर्वच नेत्यांचे व कार्यकर्तांचे फोटो झळकत आहेत.    मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या वेळी देसाई गट विभागला गेला होता मात्र आत्ता  पोष्टरवर त्या वेळी गटाचे काम निष्ठेने करणारे तसेच निवडणुकीपासून काही कारणाने अलिप्त राहिलेल्या देसाई गटाच्या माजी जि.प.सदस्य डी .वाय पाटील,  सुर्यकांत पाटील, माजी जि.प.सदस्य दत्तात्रय वेल्हाळ  सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील माजी चेरमन शिरीष जोशी,बापू पैलवान विद्यमान सरपंच सौ.अलका पाटील,  विजयसिंह पाटील अशा असंख्य कार्यकर्त्यांची रेलचेल   दिसून येत आहे. पोष्टरवरील चित्र मतदारांना  आशादायी वाटत असले तरी सर्वसामान्य लोकांच्यापुढे भविष्यात  पोष्टरवरील मान्यवरांपैकी कोणावर विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यातच  जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे शिक्षण सभापती राजेश पवार यांनी देखील आगामी चाफळ ग्रामपंचायत व विधानसभेसाठी चंग बांधला आहे. हे देखील जनतेच्या चाणाक्ष नरजेतून सूटलेले नाही.
एकूणच देसाई गटाची चाफळ व  विभागाची मदार सर्वच लोकांनी कोणाच्या हाती  असावी ही भूमिका ठरवली आहे. लोकांच्या या अंर्तःमनाचा कल आ.देसाई जाणून घेणार का? की परिस्थितीचा राजकीय फायदा उठवण्यात माहीर असलेले माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आपल्या एकनिष्ठ  कार्यकर्त्याला अचूक मार्गदर्शन करून  भविष्यात बाजी  मारणार का?अशी चर्चा चाफळ भागात होत आहे. 
नेत्यांची विश्‍वासार्हता महत्वाची असून कोण किती विकासकामे करतो याचा लेखाजोखा जनतेकडे असल्याने गटातटापेक्षा भागातील कामे करा, अशी  चर्चा जनतेत होत आहे.