Fri, Jan 18, 2019 19:35होमपेज › Satara › आदर्की बुद्रुक येथील शाळेचा संगणक विभाग जळून खाक

आदर्की बुद्रुक येथील शाळेचा संगणक विभाग जळून खाक

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:40PMफलटण : प्रतिनिधी

आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील संगणक विभागास शनिवारी सकाळी आग लागली. यामध्ये संगणक विभाग बेचिराख होऊन दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. आगीमुळे शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या संगणक विभागाच्या खिडकीतून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ व तरुणांनी बादलीतून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.

त्यानंतर शरयु अ‍ॅग्रो साखर कारखान्याचे अग्‍निशामक दल दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत 12 संगणक, प्रिंटर्स, झेरॉक्स मशिन, फर्निचर, खुर्च्या, टेबले व काही कागदपत्रे आगीमध्ये जळून भस्मसात झाली. याबाबतची तक्रार मुख्याध्यापिका सौ. चंदाराणी धर्माधिकारी यांनी आदर्की बुद्रुक पोलिस चौकीत दिली .