Fri, Mar 22, 2019 08:38होमपेज › Satara › बंदला कराड शहरात संमिश्र प्रतिसाद

बंदला कराड शहरात संमिश्र प्रतिसाद

Published On: Sep 10 2018 2:08PM | Last Updated: Sep 10 2018 2:08PMसातारा : प्रतिनिधी

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कराड शहरात मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. दत्त चौकापासून सुरू झालेली ही रॅली बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा मार्गे  मुख्य रस्त्याने पुन्हा दत्त चौकात आली. या ठिकाणी सभेने रॅलीची सांगता झाली. 

आमदार आनंदराव पाटील म्हणाले,  भाजप सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. जातीभेदाचे, विद्वेषाचे वातावरण देशभर तयार केले जात आहे . नोटाबंदी, जीएसटीमुळे अनेक उद्योग बंद घडले, बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. आता पेट्रोल डिझेलची दरवाढ भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे. यावेळी काँग्रेस मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.