Sun, May 26, 2019 21:06



होमपेज › Satara › गटतट विसरून विकासासाठी एकत्र या

गटतट विसरून विकासासाठी एकत्र या

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:41PM

बुकमार्क करा





सणबुर : वार्ताहर

मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 50 गांवामध्ये स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते व ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार ही कामेही प्रस्तावित केली आहेत. हे उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता या योजनेमध्ये सहभागी असणार्‍या सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा तसेच या योजनेमध्ये कामे करायच्या गावातील, वाडीवस्तीमधील सर्व ग्रामस्थांना गटतट पक्ष न पहाता सहभागी होऊन गावाचा विकास साधण्यासाठी एकी निर्माण करावी, असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.

पाटण येथे बैठकीत ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पाटण पंचायत समितीचे सदस्य व गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सुभद्रा शिरवाडकर, बशीर खोंदू, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, वन विभागाचे काळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर.एस. पाटील,  तालुका कृषी अधिकारी तुषार जाधव, नायब तहसीलदार माने, वीज वितरणचे उपअभियंता जाधव, सागरे यांची प्रमुख   उपस्थित होती. 

प्रारंभी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी मनरेगा योजनेतंर्गत करावयाच्या सर्व कामांची माहिती दिली. यावेळी काही सरंपचांनी पाणंद रस्त्याच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये महसूल विभागाने पुढाकार घेवून अशा समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. आ. शंभूराज देसाई यांचे वह्या देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नोकरी म्हणून नव्हे तर आवडीने काम करा : आ. देसाई

मनरेगा योजनेतंर्गत तालुका तसेच गावस्तरावर कार्यान्वित असणार्‍या शासकीय यंत्रणेने नोकरी म्हणून नाही तर आवडीने व प्रचंड इच्छाशक्तितून या योजनेत सहभाग घेतल्यास अनेक गावांना याचा लाभ होणार आहे. या योजनेतंर्गत इतर तालुक्यामध्ये अनेक ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी यांनी चांगल्या प्रकारे काम करुन दाखविले आहे. तालुक्यात लोकसहभागातून आणि शासकीय यंत्रणांच्या पुढाकाराने ही कामे व्हावीत, असेही आ. शंभूराज देसाई यांनी सांगितले.