Wed, Jul 17, 2019 10:24होमपेज › Satara › सहकारी संस्थांनी बदलणे गरजेचे : सुभाष देशमुख

सहकारी संस्थांनी बदलणे गरजेचे : सुभाष देशमुख

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 8:48PMपाटण : प्रतिनिधी

समाजाच्या गरजा बदलत आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांनीही बदल करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी पाटण येथील श्रीराम पतसंस्थेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.

कराड अर्बंन बँकेकडून आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पाटणमधील श्रीराम नागरी पतसंस्थेचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर व उपाध्यक्ष हिंदुराव सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ना. शेखर चरेगावकर होते. सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे,  दिलीप पतंगे, जिल्हा निबंधक  डॉ. महेश कदम, उपनिबंधक डॉ. महेंद्रकुमार चव्हाण,  अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सतीश  मराठे व ना.शेखर चरेगांवकर यांनी सहकारी संस्था पुढील कोणकोणती आव्हाने आहेत याबाबतचा उहापोह केला. त्यामध्ये मुख्यत: सहकारी चळवळीला प्रतिष्ठा प्र्राप्त करून देणे आवश्यक असल्याचे सांगत आज बाजारपेठेत मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत टिकणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अबलंब आवश्यक असून व कायद्यातील बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, असे आवाहनही योवळी करण्यात आले. 

सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी मेळाव्यास उपस्थितीत असणार्‍या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सचिव यांच्याकडून सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत अडचणी कोणत्या आहेत ?  हे जाणून घेत त्या दूर करण्याबाबत काय करता येईल? याबाबत सूचना कराव्यात असे आवाहन केले. सहकारी पतसंस्था ग्रामीण भागात काम करतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. त्यासाठी पतसंस्थांना एनपीए नॉर्मस सहा महिन्याऐवजी कायम स्वरूपी नऊ महिने असावा, अशी सूचना विलासराव क्षीरसागर यांनी मांडली. . त्याबाबत सहकारमंत्री म्हणून काय करता येईल? हे पाहू असे सांगत कायद्यात बदल करताना या सूचनांचा विचार केला जाईल, असे नमूद केले. 

 

Tags : satara, satara news, Co operative, organizations, Need change,