Wed, Aug 21, 2019 19:10होमपेज › Satara › तख्ताच्या वाड्यातील खलबतखान्याची स्वच्छता

तख्ताच्या वाड्यातील खलबतखान्याची स्वच्छता

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 10:52PMसातारा : प्रतिनिधी

अटकेपार मराठी साम्राज्याचा विस्तार करताना ज्या तख्ताच्या वाड्यातून कारभार करण्यात आला त्या खलबतखान्याच्या स्वच्छतेचा शुभारंभ  पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, महिला बालकल्याण सभापती अनिता घोरपडे यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी नगरसेविका लता पवार, किशोर शिंदे, रजनी जेधे, विजय काटवटे, सागर साळुंखे, सविता फाळके, सागर पावशे, ज्ञानेश्‍वर फरांदे आणि पालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  राजधानी सातार्‍यात छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र छ. शाहूंना जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे. याचे अनुकरण राज्यात नव्हे तर देशात व्हावे, अशी इच्छा किशोर शिंदे यांनी व्यक्त केली. सातार्‍याची शान असलेल्या वास्तूंचे संवर्धन केल्यास ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार असल्यामुळे सातारकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे विजय काटवटे यांनी सांगितले. 

पालिकेच्या उपक्रमाची माहिती लता पवार यांनी दिली. यावेळी नागरिकांसाठी छ. शाहू उद्यानात जॉगिंग ट्रॅक उभारणार्‍या भावे उद्योग समूहाच्या वृषाली भावे उपस्थित होत्या.खलबतखान्याची स्वच्छता करताना सुरुवातीला राजेशिर्के यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी श्रमदान केले. यावेळी अबाल-वृद्ध आणि लहान मुलेही श्रमदानात सहभागी झाली होती. उद्याना समोर असलेल्या विहिरीवरील मदारी हत्तीचे शिल्प छ. शाहू उद्यानात बसवण्याची  मागणी यावेळी करण्यात आली. सातार्‍यात छ. शाहू कालीन वास्तूंचे जतन करण्याची मोहीम सुरू झाली असून महादरे तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. रंगमहालही भविष्यात पालिकेच्या अखत्यारीत घेण्यासाठी प्रयत्न करणार असून राजधानी सातार्‍याचे वेगळे महत्व जगाच्या पटलावर मांडण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.  

Tags : Satara, Cleanliness,  potshedm hall