Mon, Aug 19, 2019 07:46होमपेज › Satara › स्वच्छ सर्वेक्षणमध्ये म’श्‍वर राज्यात प्रथम

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये म’श्‍वर राज्यात प्रथम

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:12PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगरपालिकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक पालिका आपल्या क्षमतेनुसार शहरामध्ये जास्ती जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसात महाबळेश्‍वर पालिकेने केलेले प्रयत्न फळाला आले आहे. सोमवारी महाबळेश्‍वर पालिका या स्पर्धेतंर्गत राज्यात पहिल्या तर देशात 17 व्या क्रमांकावर मजल मारली आहे. 

महाबळेश्‍वर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा फिव्हर चढला आहे. स्वच्छता जागृतीसाठी विविध उपाय योजले जात आहेत. स्वत: लोकप्रतिनिधी ग्राऊंड लेवलला येऊन काम करत असल्याने नागरिकांमध्येही जोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वी पहिल्या 50 मध्ये नसलेली महाबळेश्‍वर पालिका सोमवारी राज्यात पहिल्या स्थानी विराजमान झाली. आता पालिकेचा देशात ... वा क्रमांक आहे.  

स्वच्छ सर्वेक्षण ही एकूण 1400 गुणांची ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 4 हजार 41 नगरपालिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये पहिल्या 20 नगरपालिकांना क्रमांक पटकावण्यासाठी संधी मिळणार आहे. सोमवारी जाहीर झालेल्या रँकीगनुसार महाबळेश्‍वर पालिका 17 व्या क्रमांकावर आली आहे. याबाबत राज्याचा विचार केला तर महाबळेश्‍वर पालिका प्रथम क्रमांकावर आली आहे. महाबळेश्‍वरला चंद्रपूर व पाचगणी पालिकेने चुरस दिली आहे. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने राज्यात नव्हे तर देशात अव्वल येण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या दोन्ही पालिकांनी 1 हजार 400 पैकी 1 हजार गुण प्राप्‍त केले आहेत. पुढील दिवसांमध्ये कोणत्या पालिकेला किती गुण मिळतात यावर स्पर्धेतील स्थान अवलंबून आहे.

शहरवासीयांच्या सहकार्यानेच पालिका अव्वल स्थानी असून शहराच्या स्वच्छतेस आमचे प्रथम प्राधान्य आहे. स्थानिकांच्या सूचना प्राधान्याने सोडविण्याचा पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांशी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केल्या जात आहे. यामुळे प्रभागातील नगरिकांच्या समस्या जाणून घेता येत असल्याचेे नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.