Tue, Feb 19, 2019 02:47होमपेज › Satara › सातारा : पाचशे रुपयांची लाच घेणारा सर्कल अधिकारी 'जाळ्यात'

सातारा : पाचशे रुपयांची लाच घेणारा सर्कल अधिकारी 'जाळ्यात'

Published On: Jun 04 2018 5:29PM | Last Updated: Jun 04 2018 5:29PMसातारा : प्रतिनिधी

नाहरकत दाखला देण्यासाठी 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सातारचा सर्कल अधिकारी वैभव राजाराम माळी (वय 45, मूळ रा.रहिमतपूर ता.कोरेगाव) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सोमवारी दुपारी ही कारवाई झाल्यानंतर खळबळ उडाली असून 500 रुपयांची लाच घेतली जात असल्याने प्रशासन किती निगरगट्ट आहे हेच समोर आले आहे.

पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणातील तक्रारदार यांना एक नाहरकत दाखल पाहिजे होता. यासाठी वर्ये ता.सातारा येथील सर्कल अधिकारी वैभव माळी याला ते भेटले. मात्र संबंधित काम करण्यासाठी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार दिली. सोमवारी लाचेची रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा रचला. या सापळ्यामध्ये माळी अलगद सापडला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.