Mon, Jan 21, 2019 23:32होमपेज › Satara › कोवळ्या उन्हात बालचमूंची भरली शाळा

कोवळ्या उन्हात बालचमूंची भरली शाळा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 10:59PM

बुकमार्क करा
शिरवळ : अमोल लोखंडे

शिरवळ परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी उशिरापर्यंत अनेकजण शेकोट्यापुढून हलेना झाले आहेत. मग शाळेत तरी चिमुरड्यांनी भल्या सकाळी कुडकुडत का बसावे? शिक्षकांनीही शनिवार व्यतिरिक्‍त इतर दिवशीही कोवळ्या उन्हात त्यांची शाळा भरवू लागले आहे. त्यामुळे बालचमूंही मग अभ्यासाचा आनंद या कोवळ्या उन्हात लुटू लागला आहे. 

गेल्या आठवड्यापासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.विविध गावांतून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. रात्री व पहाटे कामावर जाणारे कामगारही रस्त्याच्याकडेला शेकोट्यांची उब घेत आहेत. जोरदार थंडीची लाट सुटलेली असून हवेतील गारवा दिवसाही जाणवत आहे.नागरिक  उन्हात कामे करताना दिसत आहेत तर शनिवारसह इतर दिवशीही जिल्हा परिषदेच्या शाळा मैदानात भरत आहेत.

फळा व वर्गाविना शाळेचा आनंद मुले घेताना दिसत आहेत. नीरानदी काठची गावे व शिरवळ, शिंदेवाडी, विंग, हरतळी, भाटघर हा परिसर दाट धुक्यात हरवून जात आहे. गारठा असला तरी सकाळी व्यायाम व फिरायला जाणारे नागरिक थंडीचा आनंद घेत आहेत.