Tue, Jul 16, 2019 01:46होमपेज › Satara › मोबाईल न दिल्याने मुलाचे विषप्राशन 

मोबाईल न दिल्याने मुलाचे विषप्राशन 

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:51PMसातारा : प्रतिनिधी

नडवळ (ता. खटाव) येथे आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका 15 वर्षीय मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. 

सुमित संजय कुकळे असे विषारी औषध प्राशन केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सुमितने नवीन मोबाईल घेण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट धरला होता. मात्र, अनेकदा मागणी करूनही मोबाईल न घेतल्याने त्याने शनिवारी विष प्राशन केले. 

सुमित शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंथरूनातून उठला. त्यानंतर अचानक त्याने साडेसात वाजता विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तत्काळ नजिकच्या दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.