होमपेज › Satara › ‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज : मुख्यमंत्री

‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज : मुख्यमंत्री

Published On: Feb 24 2018 10:01PM | Last Updated: Feb 24 2018 10:01PMसातारा : प्रतिनिधी

‘व्वा!’ हा ‘पुढारी’ने काढलेला विशेषांक आहे का? ग्रेट, खा. उदयनराजेंसारखाच विशेषांकही दणकेबाज झालाय बरं का, हे उद्गार  आहेत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे. 

पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवतीर्थावर छत्रपतींच्या पुतळ्यासमोर दै.‘पुढारी’ने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रसिद्ध केलेल्या ‘सुवर्णपर्व उदयनराजेंचे’ या सोळा पानी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विशेषांकाचे आवर्जुन अवलोकन केले.

त्यातील ‘कॅची टॅगलाईन’ पाहताना मुख्यमंत्री बेहद खुष झाले. उदयनराजेंकडे त्यांनी कौतुकमिश्रीत नजरेने पाहिले. ‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज झालाय, असे ते म्हणाले तेव्हा उदयनराजेंनीही चिमटा काढत ‘पुढारी’ची टीमही दणकेबाज आहे, असे प्रत्युत्तर दिले. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अशोक सावंत,  अॅड. डी. जी. बनकर, धनंजय जांभळे, विजय काटवटे, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘पुढारी’च्यावतीने विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक नितीन निकम व ‘पुढारी’ परिवाराने मुख्यमंत्र्यांचे शिवतीर्थावर स्वागत केले.