Sat, Aug 24, 2019 23:39होमपेज › Satara › आर्मीत नोकरीच्या अमिषाने फसवणूक

आर्मीत नोकरीच्या अमिषाने फसवणूक

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:31PMवडूज : वार्ताहार

आर्मीत नोकरी लावतो म्हणून खटाव तालुक्यातील पाच युवकांची 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंद असून आरोपी राजकुमार बजरंग काटकर (वय -48 रा. शिरसवडी ता. खटाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, फिर्यादी आकाश सूर्याजी माने रा. शिरसवडी, सुहास दत्तात्रय कुंभार, दुर्गेश विलास हजारे, पंकज धनंजय माने रा. वडूज, सतीश शंकर फडतरे रा. उंबर्डे या चौघांकडून प्रत्येकी 2 लाख रुपये असे मिळून 8 लाख रुपये तर फिर्यादी आकाश माने याच्याकडून एक लाख रुपये असे मिळून 9 लाख रुपये घेतले. त्यांना सातारा येथील आर्मी भरतीमध्ये भरती करतो, असे सांगून फसवणूक केल्याचे संबंधितांच्या लक्षात आले.

फिर्यादी आकाश माने याने पैशाची मागणी केली असता त्याला एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेश न वटल्याने फिर्यादीने 6 एप्रिल रोजी राजकुमार काटकर याला एक लाख रुपयांची मागणी केली असता, बंदुकीचा धाक दाखवून तू परत पैसे मागितले तर तुला इथेच मारून टाकीन, मी पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणून त्याला मारहाण केली. माझ्या पतीच्या नादाला लागलास तर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस टाकीन, यापूर्वी मी पण खोट्या केसेस टाकल्या आहेत, अशी धमकी नीता डोंबे रा. शिरसवडी हिने दिली असल्याची फिर्याद आकाश सूर्याजी माने याने वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. 

या फिर्यादीवरून वडूज पोलीस ठाण्यात 420, 504, 506, 34, हत्यार अधिनियम 27 प्रमाणे राजकुमार बजरंग काटकर व नीता डोंबे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून संशयित राजकुमार काटकर याला वडूज पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास  पो. निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक धरणीधार कोळेकर, पो. हवा. शांतीलाल ओंबासे, पो. नाईक सचिन भिलारे करीत आहेत.

 

Tags : satara, Vaduj, Vaduj news, crime, Cheating,