होमपेज › Satara › महाबळेश्‍वर, पाचगणीच्या मुख्याधिकार्‍यांना ९० हजारांचा गंडा

महाबळेश्‍वर, पाचगणीच्या मुख्याधिकार्‍यांना ९० हजारांचा गंडा

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:18PMपाचगणी : वार्ताहर 

महाबळेश्‍वर व पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे-पाटील यांनी इन्श्युरन्स कंपनीचा हप्ता भरला नसल्याचे कारण सांगून त्यांना खात्यात 90 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी खात्यात पैसे भरले. मात्र, हे पैसे दुसर्‍याच खात्यात जमा झाले. सौ. दगडे-पाटील यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला.  

सौ. अमिता दगडे-पाटील या लाईफ इन्श्युरन्स कंपनीत विम्याचा हप्ता भरतात. शुक्रवारी दुपारी त्यांना लाईफ इन्श्युरन्स कंपनीतून बोलतोय तुमचा हप्ता भरला नसल्याचा फोन आला. हा हप्ता भरण्यासाठी फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने सौ. दगडे-पाटील यांना खाते क्रमांक दिला. या खात्यावर त्यांनी 90 हजार रुपये भरले. मात्र, यानंतर त्यांनी स्टेट बँकेत याची चौकशी केल्यानंतर हे पैसे जमाच झाले नसल्याचे लक्षात आले.