Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Satara › आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान गळपटले

आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान गळपटले

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:51PMपाचगणी : वार्ताहर  

पाचगणी येथील नचिकेत हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या  753 अदिवासी विद्यार्थ्यांचे 4 कोटी रुपयांचे अनुदान गळपटल्याबाबत अहमदनगर येथील विद्यामाता ट्रस्टचे अभय अगरकर, प्राचार्य सुलताना शेख यांच्यासह अदिवासी मंत्री सावरा यांचा स्वीय सहाय्य महेंद्र देवरा तसेच पुणे येथील डीवायएसपी यांच्या पत्नीची  चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत.

अहमदनगर येथील विद्यामाता ट्रस्टकडून नचिकेत हायस्कूल शाळा चालवण्याकरिता घेण्यात आली होती. याकरिता नचिकेत हायस्कूल व विद्यामाता ट्रस्टमध्ये कच्चे अ‍ॅग्रिमेंट करण्यात आले होते. त्यानुसार 3 ऑक्टोबर 2017 रोजी व 22 जानेवारी 2018 रोजी नचिकेत हायस्कूलमधील 756 विध्यार्थ्यांचे प्रत्येकी 50 हजार रुपयां प्रमाणे 4 कोटी अनुदान विद्यामाता ट्रस्टच्या माध्यमातून पाचगणीच्या रोजलैंड शाळेच्या खात्यावर जमा केल्याची माहिती नचिकेतच्या संचालकांना लागली.

याप्रकरणी विद्यामाता ट्रस्टच्या माध्यमातून अभय अगरकर व प्राचार्या सुलताना शेख यांनी बनाव करुन अदिवासी मंडळाचा 4 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे नचिकेत हायस्कूलच्या संचालकांच्या लक्षात आले. त्यानुसार नचिकेत स्कूलच्या संचालक मंडळाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे  या प्रकरणाबाबत लेखी तक्रार केल्यानंतर प्रधान सचिवांनी या घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

रोजलैंड स्कूलची मान्यता नसताना पैसे खात्यावर वर्ग 

756 अदिवासी विद्यार्थीचे प्रत्येकी 50 हजार रुपये अदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या पीए ने रोजलैंड स्कूलला मान्यता नसतानादेखील रोजलैंडच्या नावाने पत्र देत अनुदान रोजलैंडच्या खात्यामध्ये जमा कसे केले? हा संशोधनाचा विषय आहे.