Mon, May 25, 2020 20:03होमपेज › Satara › शिक्षक दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

शिक्षक दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:04PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पंताचा गोट येथील जागा नावावर करून देण्यासाठी तब्बल 29 लाख रुपये घेतल्यानंतरही जागा नावावर करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, 2011 पासून वेळोवेळी तक्रारदार यांनी पैसे दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. किशोर दिनकरराव घोरपडे व पत्नी मनीषा किशोर घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, ते दोघेही शिक्षक आहेत. 

अमोल भिवा रणदिवे (वय 40, रा. रविवार पेठ) यांनी याबाबतची तक्रार दिली असून, ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यातील संशयित हे तक्रारदार यांना ओळखत असून, संशयितांचे पंताचा गोट येथे घर आहे. ते विकण्यासंबंधी संशयित व तक्रारदार यांची चर्चा झाल्यानंतर त्याबाबतची काही कागदपत्रे तयार करण्यात आली. जागेचा व्यवहार ठरल्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी तब्बल 29 लाख 49 हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही घर नावावर होत नव्हते.