Sun, Oct 20, 2019 21:54होमपेज › Satara › जिल्ह्यातील आठही जागा महायुतीकडे येतील : ना. चंद्रकांत पाटील

जिल्ह्यातील आठही जागा महायुतीकडे येतील : ना. चंद्रकांत पाटील

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 02 2019 12:47AM
सातारा : प्रतिनिधी

उदयनराजे भोसले यांचा लोकसभेसाठी तर शिवेंद्रराजे भोसले यांचा विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जी गर्दी व जो जोश मिरवणुकीत होता तो जोश दाखवतो की लोकांना हे हवं होत की दोन्ही राजे एकत्र यावे व भाजपमध्ये यावे. आता सातारा जिल्ह्याचा विकास जोरात होणार आहे. सातारा जिल्ह्यातील आठही जागा महायुतीकडे येतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी उमेदवारी  अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सौ. वेदांतिकाराजे भोसले, माजी आमदार कांताताई नलावडे, निता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, आमच्याकडे फेजवाईज यादी येते काही तरी टेक्नीकल मुद्दा असल्यामुळे खडसे व तावडे यांची नावे आली नसतील. बाकी काही अडचणी नाहीत. कोल्हापूरच्या 10 जागांपैकी 8 जागा शिवसेनेकडे गेल्या आहेत या प्रश्नावर बोलताना ना. पाटील म्हणाले, युतीमध्ये शिवसेना भाजपाला दोघांनाही सफर व्हावे लागते तर युती होते. विदर्भामध्ये अनेक जिल्हे असे आहेत की एकही जागा शिवसेनेला नाही. कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे की तेथे शिवसेनेचे 6 आमदार आहेत. हे सिटींग आमदार आहेत. शिवसेना जिल्ह्यात गतवेळी चांगली लढली त्यामुळे त्यांच्याकडे त्या जागा गेल्या. सेटिंग केल्याशिवाय युती होत नाही. युतीमध्ये कुणी तरी पुढे व मागे पाऊल टाकण्याची गरज असते.

यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा आणि जावलीतल्या मतदारांनी जो विश्वास ठेवला त्याचं आज चित्र फॉर्म भरताना दिसत आहे. यावरूनच कळणार आहे की निकाल काय होणार आहे. भाजपाचे उमेदवार म्हणून मी व उदयनराजे दोघेही  सर्वांच्या आशिर्वादाने उभे असून चांगले काम भाजपाच्या माध्यमातून मतदारसंघात करू याची मला खात्री आहे.