Sat, Jul 20, 2019 13:41होमपेज › Satara › सातार्‍यात मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती उत्साहात साजरी

सातार्‍यात मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती उत्साहात साजरी

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर ही छत्रपतींची राजधानी असून शहरात सर्व जाती धर्म मिळून-मिसळून राहतात. याहीवर्षी शिवजयंती दिवशी मुस्लिम बांधव व लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी दिलेल्या  ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष रफीक शेख यांनी लहान मुलांना छ. शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान  दिले. महाराष्ट्राचे युगपुरूष व आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. त्यांच्यासोबत मुस्लिम मावळेही होते. जसे छ. शिवाजी महाराजांच्या तोफांची शान इब्राहिम खान व  पन्हाळगडावर शिवरायांसाठी ज्यांनी शत्रूला केले ‘हलाल’ असे सिद्धी हलाल. अशा अनेक मुस्लिम व इतर सर्व जातीधर्माचे लोक छ. शिवाजी महाराजांचे लढवय्ये सहकारी होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास रफीक शेख, आरीफ शेख, उमर शेख, अबू झेंडे, साहिल शेख, रोहित धंगेकर, लखन चव्हाण, आनंद काळभोर व मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.