Tue, Apr 23, 2019 23:46होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी तिघांवर गुन्हा

सावकारीप्रकरणी तिघांवर गुन्हा

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:40PMफलटण : प्रतिनिधी

हॉटेल व्यवसायासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही अधिक पैसे मागून मारहाणीचीही धमकी देणे तसेच घरातील लोकांना शिवीगाळ करणे याप्रकरणी दोघांवर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही तारण ठेवलेली जमीन परत मागण्यासाठी गेले असता शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे फलटणमध्ये  सावकारीप्रकरणी एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल देवानंद माने (वय 26, रा. मठाचीवाडी, ता. फलटण) यांनी नीलेश ऊर्फ आप्पा करचे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सोमंथळी ता. फलटण व अमिश पवार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सोमवार पेठ) फलटण यांच्याकडून 6 लाख 80 हजार रुपये व्याजावर घेतले होते. त्या बदल्यात माने यांनी 10 लाख 72 हजार रूपये परत केले होते. पैसे परत करूनही निलेश व अमिश हे दोघे घरातील लोकांना धमकी व शिवीगाळ करत होते. याविरोधात अनिल माने यांनी या दोघांविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंगटे करत आहेत.

तर दुसर्‍या एका घटनेत व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही जमीन परत दिली नाही. तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय दादासो भोसले (वय 45) रा. बिजवडी, ता. माण, (सध्या राहणार कोळकी ता. फलटण) यांनी हॉटेल व्यवसायासाठी प्रल्हाद इंगळे रा. कोळकी याच्याकडून 2016 रोजी 2 लाख रूपये 5 टक्के व्याजाने घेतले होते. ते सर्व पैसे व्याजासह डिसेंबर 2017 मध्ये दरमहा 10 हजार रूपये देऊन मुद्दल व व्याज संपूर्ण फेडले. मात्र, भोसले जमिन मागायला गेलो असता इंगळे याने शिवीगाळ व दमदाटी केली. याविरोधात भोसले यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहा. फौजदार भोईटे करत आहेत.