होमपेज › Satara › अपघातप्रकरणी तिघा वकिलांवर गुन्हा

अपघातप्रकरणी तिघा वकिलांवर गुन्हा

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:32PMमेढा : वार्ताहर

आंबेघर तर्फ मेढा येथील  कार-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी तिसर्‍या युवकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कारमधील चौघांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तंग झाले होते. यानंतर डीवायएसपी धरणे यांनी तीन दिवसांत संशयीतांना अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. तिघे संशयीत सातारामधील वकील असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी कारचालक कुलदीप अशोक भोसलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी     प्रशांत लोंबटे (शाहूपुरी, सातारा), रवींद्र चांगण (कण्हेर) व अन्य एक असे तिघेजण पसार झाले आहे. भामघर ता, जावली येथील तीन युवक (एमएच 11 जीडी 3889) या दुचाकीवरून केळघरकडे जात होते. यावेळी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्‍वरहून साताराकडे जाणार्‍या कारने (एमएच11 वाय 4875) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रशांत कोंडीबा सावले (वय 35), समीर बबन पार्टे (वय 29) हे जागीच ठार झाले तर संजय दगडू सावले (वय 31)  हे गंभीर जखमी झाले. यावेळी कारमधील चौघांनी कारच्या बॉनेटवर पडलेला मृतदेह रस्त्याकडेला व दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी आणून ठेवली. तसेच कार रस्त्यापासून रानात लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

अपघातानंतर गंभीर जखमी संजय सावले यांचाही सातारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक कुलदीप अशोक भोसलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी प्रशांत लोंबटे (शाहूपुरी, सातारा), रवींद्र चांगण (कण्हेर) व अन्य एक असे तिघेजण पसार झाले. त्यामुळे त्यांना अटक करा मगच मृतदेह ताब्यात घेवू, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतल्यामुळे वातावरण तंग झाले होते. यानंतर डी. वाय. एस. पी. डॉ. धरणे यांनी सर्व संशयीतांना ताब्यात घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. यानंतर दुर्दैवी तिघांचे शवविच्छेदन दि. 25 रोजी दुपारी करण्यात आले.

चौघेही संशयीत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक जीवन माने करीत आहेत.