Mon, Jun 24, 2019 21:19होमपेज › Satara › सातारामध्ये आज करिअरच्या वाटा सेमिनार 

सातारामध्ये आज करिअरच्या वाटा सेमिनार 

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 11:11PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

जे.के.अ‍ॅकॅडमी व दैनिक पुढारीच्या वतीने सातारा येथे शनिवार दि. 16 रोजी करिअरच्या वाटा सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

सध्या समाजामध्ये प्रत्येक पालक अथवा विद्यार्थी फक्त डॉक्टर, इंजिनिअर असे करिअर निवडताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात या करिअरला येणार्‍या काळात किती मागणी असेल अथवा त्यातून काय मिळेल हे जाणून घेणे गरजेचे आहे. याशिवाय विज्ञान क्षेत्रात करिअरच्या उपलब्ध असणार्‍या इतर संधी किती व कुठे आहेत हे माहितच नसते. त्यामुळे चांगली गुणवत्ता असणार्‍या विद्यार्थ्यांची निवड सुद्धा फक्त अज्ञाना अभावी चुकते. असे होऊ नये म्हणून आम्ही करिअर गायडन्स सेमिनारचे  आयोजन केले आहे.

 सदर सेमिनार शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता, सातारा येथील शाहू कला मंदिर व रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे घेण्यात येणार आहे. या सेमिनारसाठी आम्ही जिल्ह्यातील शाळांमधून निवडक 456 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या शिवाय इच्छुक विद्यार्थीसुध्दा सेमिनारचा लाभ घेऊ शकतात.

पासेससाठी आयोजकांकडे  संपर्क साधावा. 
 सेमिनार ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर होणार असून, यामध्ये अनेक तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये 10 वीचा पेपर कसा लिहावा व स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र ही सांगितले जाणार आहे. त्याची एक छोटी पुस्तीका विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

सेमिनारसाठी शाळांना निमंत्रित करण्यात आले  आहे. विज्ञान व गणित शिक्षकांचाही यामध्ये सहभाग असणार आहे. विद्यार्थ्यांनी फोनद्वारे आसन क्रमांक आरक्षित करणे गरजेचे आहे, अशी माहिती जे.के. अ‍ॅकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शेळके यांनी दिली.