Sat, Jun 06, 2020 22:26होमपेज › Satara › कुडाळ पाचगणी रोडवर कार पुलावरून पलटी 

कुडाळ पाचगणी रोडवर कार पुलावरून पलटी 

Published On: Sep 07 2018 8:01AM | Last Updated: Sep 07 2018 8:01AMकुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ पाचगणी रोडवरील शेते पुलावरुन कार खाली कोसळली. रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. यात कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेते, ता. जावळी येथील पुलावरुन भरधाव वेगात कार खाली कोसळली. यानंतर कार पलटी झाली. पुलावरुन कोसळलेली कार (एमएच ११ सीसी ६८५२) इंदवली ता. जावळी येथील आहे. कार खाली कोसळल्यानंतर तेथील विहिरीच्या काठावर थांबली. दैव बलवत्तर म्हणून कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडली नाही. त्यामुळे चालकाचा जीव वाचला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान चालकाला उपचारासाठी सातारा रुग्णालयात दाखल केले आहे.