होमपेज › Satara › गावच्या मातीतील सत्काराने भारावलो : कॅप्टन अमोल यादव

गावच्या मातीतील सत्काराने भारावलो : कॅप्टन अमोल यादव

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:01PMसणबूर : वार्ताहर

भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविल्याबद्दल माझा सत्कार राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणी मेक इन इंडिया मध्ये अनेक मान्यवरांनी केला.पण गावच्या मातीतील सत्काराने मन भारावले आहे. सळवे गाव हे माझे कुंटुब आहे आणि कुटुंबाची साथ असल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही, असे भावूक उद‍्गार कॅप्टन अमोल यादव यानी काढले.

सळवे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी वडील शिवाजीराव यादव, आई माधुरी यादव, पत्नी   योगीता यादव, ढेबेवाडीचे पो.नि. स्वप्नील लोंखडे, सरपंच शंकर कुंभार, प्रकाश पवार, किसन घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॅप्टन अमोल यादव यांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. 

कॅप्टन यादव म्हणाले, मोठे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडे बनून ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्या. तेंव्हाच ते स्वप्न सत्यात ऊतरेल.विमान बनवावे हे माझ्या वडीलांचे स्वप्न होते. त्यासाठी कुटुंबाने खूप मेहनत घेतली. कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले, अपयश आले पण पुन्हा जिद्दीने घरच्या गच्चीवर विमान बनवण्यात यश मिळवले. आज मी  इथ पर्यंत आलोय ते केवळ मेहनत, जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर. पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 

पो.नि. स्वप्नील लोंखडे म्हणाले, कॅप्टन अमोल यादव याच्या कामगिरी मुळे सळवे गावचा व पाटण तालुक्याचा उर अभिमानाने भरुन आली आहे. अमोल यादव हे युवकाचे प्ररणास्थान असून युवकांनी आपले ध्येय निश्‍चित करुन वाटचाल करावी. सूत्रसंचालन बाळासाहेब कदम यांनी केले. आभार प्रकाश पवार यांनी मानले. 

विभागात कारखाना काढण्याची इच्छा अपुरी..

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची इच्छा होती की, अमोल यादव यांनी विमान बनवण्याचा कारखाना आपल्या विभागात काढावा. परंतु काही कारणामुळे ते शक्य झाले नाही, असे अमोल यादव यांचे वडील शिवाजीराव यादव यांनी सांगितले.

 

Tags : satara, satara news, Amol Yadav, greet, Salve villagers,