Wed, Feb 26, 2020 22:12होमपेज › Satara › लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुकांनी नेले ३३२ अर्ज

लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुकांनी नेले ३३२ अर्ज

Published On: Oct 01 2019 2:03AM | Last Updated: Oct 01 2019 12:37AM
सातारा : प्रतिनिधी
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून इच्छुकांनी 26 तर आठ विधानसभा मतदारसंघांसाठी 306 असे सर्व मिळून 332 उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून एक जणाने उमेदवारी दाखल केली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मंगळवारी दोन्हीही क्षेत्रांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी अ‍ॅड. डी. जी. बनकर  यांनी भाजपमधून लढण्यासाठी 4 उमेदवारी अर्ज नेले आहेत. समीर भोसले    रा. भोसले मळा, (सातारा) यांनी शिवाजी भोसले यांच्यासाठी अपक्ष लढण्यासाठी 4 उमेदवारी अर्ज नेले. विशाल आव्हाड रा. विमल गार्डन अपार्टमेंट यांनी अभिजीत आवाडे-बिचुकले  तसेच अलंकृता आवाडे-बिचुकले यांना अपक्ष लढण्यासाठी प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज नेले. सुभाष शिलेवंत रा. शिरगाव (ता. कराड) यांनी स्वत: अपक्ष लढण्यासाठी 1 अर्ज, सतीशकुमार यादव रा. वाठार (ता. कराड) यांनी स्वत: अपक्ष लढण्यासाठी 1 अर्ज, आनंदराव जानकर रा. पाटखळ यांनी अपक्ष लढण्यासाठी 1 अर्ज, दिलीप जगताप रा. बावधन  (ता. वाई) यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतून लढण्यासाठी 1 अर्ज, मल्लेश जानकर रा. सदरबझार यांनी आनंदा थोरवडे रा. कराड यांच्यासाठी बहुजन समाज पार्टीतून लढण्यासाठी 4 अर्ज, अधिकराव चन्ने रा. कडेगाव (जि. सांगली) यांनी स्वत:साठी अपक्ष लढण्यासाठी 2 अर्ज नेले. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी सर्वमिळून 26 अर्ज नेले.

सातारा विधानसभा मतदारसंघासाठी 39 जणांनी अर्ज नेले.  शिवेंद्रराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना भाजपातून लढण्यासाठी अविनाश कदम यांनी प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज नेले. सरदार भोगावकर रा. म्हसवे रोड यांनी आम आदमी पार्टीतून लढण्यासाठी 4 अर्ज, विशाल अवघडे यांनी अभिजीत आवाडे-बिचुकले व अलंकृता आवाडे-बिचुकले यांच्यासाठी अपक्ष लढण्यासाठी प्रत्येकी 4 अर्ज, माधुरी भोसले रा. भोसले मळा यांनी शिवाजी भोसले यांच्यासाठी अपक्ष म्हणून लढण्यासाठी 4 अर्ज, हणमंत तुपे यांनी प्रदीप साळुंखे यांच्यासाठी अपक्ष लढण्यासाठी 1 अर्ज, अ‍ॅड. विजयानंद शिंदे रा. आखाडे (ता. जावली) यांनी अपक्ष लढण्यासाठी 2 अर्ज, तुषार घमरे रा. सारखळ यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतून लढण्यासाठी 4 अर्ज नेले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी 306, लोकसभेसाठी 26 असे सर्वमिळून 332 उमेदवारी अर्ज नेले आहेत.