Fri, Jun 05, 2020 11:47होमपेज › Satara › पृथ्वीराज चव्हाण भारतीयांच्या बाजूचे आहेत का ?;मुख्यमंत्र्यांचा सवाल (video)

पृथ्वीराज चव्हाण भारतीयांच्या बाजूचे आहेत का ?;मुख्यमंत्र्यांचा सवाल (video)

Published On: Sep 16 2019 12:17PM | Last Updated: Sep 16 2019 12:31PM
कराड : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे जम्मू काश्मिरमधील 370 कलम हटवल्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे या माजी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही 370 कलमच्या बाजूचे की विरोधातील ? काश्मिरमध्ये भारताचा तिरंग्याला महत्त्व मिळावे की काश्मिरच्या झेंड्याला ? देशात आरक्षण पण काश्मिरमध्ये आरक्षण नव्हते. त्यामुळे तुम्ही आरक्षणाच्या बाजूचे की विरोधातील ? कोणत्याही भारतीयाला काश्मिरमध्ये जमीन घेता येत नव्हती. त्यामुळे काश्मिरच्या बाजूचे की भारतीयांच्या बाजूचे ? असे प्रश्न विचारात या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे.

कराडमधील फर्न हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण रोज दिशाभूल करणारी नवनवी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात 13 व्या क्रंमाकावर घसरल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र आठव्या क्रंमाकावर होता असे ते स्वतः म्हणत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र तिसर्‍या क्रंमाकावरून आठव्या क्रंमाकावर का घसरला होता ? याचे उत्तर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अगोदर दिले पाहिजे. निती आयोगाचा रिपोर्ट बघा, महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात गुंणतवणुकीत पहिल्या क्रंमाकावर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, नामदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार शेखर चरेगावकर, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगलीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते