होमपेज › Satara › कराड दक्षिणेत भाजपची ताकद वाढली

कराड दक्षिणेत भाजपची ताकद वाढली

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 10:46PM रेठरे बु : (कराड, सातारा)  दिलीप धर्मे

भाजपने डॉ. अतुल भोसले यांच्यातील नेतृत्व गुणाची पारख करून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या आहेत. मिळालेल्या संधीचे सोने करत डॉ. भोसले यांनीही आपले नेतृत्व सिध्द केले आहे. आज कराड दक्षिणमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे ती केवळ डॉ. अतुल भोसले यांच्या कामाच्या रेट्यामुळे. दक्षिणेत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे त्यांनी तयार केल्याचे दिसून येत आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपाची ताकद वाढली आहे. शिवाय कोट्यवधीची विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भविष्यात युवा नेत्याला विरोधक कसे रोखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

ज्येष्ठ नेते.स्व.यशवंतराव मोहिते  यांनी या भागाचे नेतृत्व केले. डॉ.अतुल भोसले यांनी हा वारसा चालवावा यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते यांच्यासह काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.भाजपात प्रवेश करून डॉ.भोसले यांनी मुख्यमंत्र्यांपासून मंत्रीमंडळातील अनेक वजनदार मंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. कराड नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,  सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाने भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. रेठर्‍यासह परिसरातील गावात कोट्यवधींची विकास कामे होत आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील या युवा नेत्याला ताकद देत आहेत. ना.चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमा दरम्यान रेठरेकरांनो युवा नेत्याच्या विजयी मिरवणुकीसाठी तयार व्हा, असे सूचक विधान केले होते. डॉ.भोसले यांना पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे  अध्यक्ष करून त्यांनी दिलेला शब्द तळ पाळलाच आहे. लोकांना वाटते मंत्री बोलतात पण करत मात्र नाहीत, पण येथे मात्र जे बोलतील ते देतात हेच खरे ठरत आहे. डॉ.अतुल भोसले यांच्यामुळे कराड दक्षिणेत भाजपाची ताकद तर वाढत आहे. शिवाय मंत्र्यांच्या दौर्‍यांनी निधींचाही दुष्काळ संपत असल्याने दक्षिणेतील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
 

Tag : CM, Devendra Fadnavis, Dr Bhosale, BJP Strength, Karad South