Wed, Nov 21, 2018 18:07होमपेज › Satara › सीबीआयने दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड शोधावा : डॉ. हमीद दाभोलकर

सीबीआयने दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड शोधावा : डॉ. हमीद दाभोलकर

Published On: Aug 19 2018 10:19AM | Last Updated: Aug 19 2018 10:30AMसातारा :  प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर पाच वर्षांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे. सचिन अणदुरे याला अटक करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. आता एटीएस आणि सीबीआय यांनी मास्टर माईंड शोधून मेंदूपर्यंत जावे असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘पुढारी ऑनलाईन’शी बोलताना सांगितले.

दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. अडीच वर्षांपूर्वी तावडेला अटक केली होती. त्यानंतर  सीबीआयने औरंगाबादमधून  सचिन अणदुरेला अटक केली हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे हमीद दाभोलकर म्हणाले. 

आता सीबीआयने लवकरच  या कटाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? याचा मास्टर माईंड शोधावा आणि  त्याच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे शोधून  काढावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठपुरावा व उच्च न्यायालयाने या केसच्या तपासात सातत्य ठेवले आहे. त्यामुळेच हे शक्य होऊ शकले. आता डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाचा कटाचा उलगडा लवकर होईल अशी अपेक्षाही हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा दुसरा  मारेकरी  सापडल्यानंतर  दैनिक पुढारी सातारा आवृत्तीचे न्यूज ब्युरो हरिश पाटणे यांनी पुढारी ऑनलाईनसाठी घेतलेली ही   एक्स्लुझीव्ह प्रतिक्रिया. पहा काय म्हणाले डॉ. हमीद दाभोलकर...

(व्हिडीओ : इम्तियाज मुजावर)