Wed, Jan 16, 2019 13:53होमपेज › Satara › अपघातात बुलेटस्वार ठार 

अपघातात बुलेटस्वार ठार 

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:17AMवाई /मांढरदेव : प्रतिनिधी

येथील भद्रेश्‍वर पुलानजीक सावंत वीटभट्टीसमोर दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सतीश शिवाजी वानखेडे (वय 32, रा. मांढरदेव, ता. वाई) असे मृताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मांढरदेव येथील सतीश वानखेडे हे दुपारी 12.30 च्या सुमारास बुलेट (एमएच 11 सी जी 7650) वरून खानापूरला क्रिकेट मॅच खेळण्यासाठी चालले असताना पुण्याहून महाबळेश्‍वरकडे निघालेल्या फॉर्च्युनर कार (एम एच 02 सी एल 5121) व बुलेट यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सतीश वानखेडे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी डॉ. जयघोष कद्दू यांच्या गीतांजली हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अधिक तपास सहायक निरीक्षक बबन एडगे करीत आहेत. अपघातात वाहनांचेही नुकसान झाले आहे. सतीश वानखेडे यांचे मांढरदेव येथे पूजेच्या साहित्याचे दुकान असून त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षांचा मुलगा,  चार वर्षांची मुलगी, विवाहित चार बहिणी असा परिवार आहे.